यवतमाळ : मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना (Narayan Rane) मंत्रीपद दिल्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आता शिवसेना (Shiv Sena) महाराष्ट्रात अधिक त्वेषाने वाढेल, जोमाने काम करेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) व्यक्त केले. (Uday Samant Says, "Narayan Rane's appointment as Minister has no effect on Shiv Sena")
शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेन्टिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदयसामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेचे कट्टर टीकाकार असलेले नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळविस्तारात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे मुंबईसह कोकणातील शिवसेनेला हादरा बसेल अशा वावड्या जाणीवपूर्वक उठविल्या जातअसल्याचे सांगत, प्रत्यक्षात जेव्हा-जेव्हा शिवसेनेला अशा पद्धतीने डिवचले जाते, तेव्हा शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागतो. त्यामुळेराणेंच्या मंत्रीपदाने शिवसेना वाढीला हातभारच लागणार असल्याचे सामंत म्हणाले.
हे व्हेन्टिलेटर बिघडणार नाहीपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले व्हेन्टिलेटर बिघडणार नाही. कारण हे व्हेन्टिलेटर केंद्र शासनाने पाठविलेल्या व्हेन्टिलेटरप्रमाणेकामचलावू नाही. केंद्राने यवतमाळात पाठविलेल्या ३५ व्हेन्टिलेटरपैकी केवळ २१ व्हेन्टिलेटर सुरू आहेत. तर उर्वरित १४ व्हेन्टिलेटर खराबनिघाले. हीच परिस्थिती केंद्राने अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविलेल्या व्हेन्टिलेटरची आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली. शिवसेनेने दिलेलेव्हेन्टिलेटर दीर्घ काळ टिकणारे असून आरोग्य प्रशासनाने त्याचा योग्य वापर करावा असेही त्यांनी सांगितले.