शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार; भाजपला टीकांचा 'भारतरत्न' द्या: संजय राऊत

By मोरेश्वर येरम | Published: December 22, 2020 4:22 PM

भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात, असं संजय राऊत म्हणाले.

ठळक मुद्देसंजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोलउद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अनेकांची इच्छा असल्याचं राऊत यांचं वक्तव्यटीका करण्याचं 'भारतरत्न' भाजपला द्यायला हवं, असा टोला राऊत यांनी लगावला

मुंबईराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केल्यावर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 

"भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात. टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"टीका करणाऱ्यांना लोकं मारायची आहेत. तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लादण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही", असंही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणारआगामी काळात अनेक राजकीय भूकंप होणार असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. "महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत होते. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय ते दिसेल. भविष्यात तो भूकंप होईल त्याचं केंद्रस्थान शिवसेना भवन असेल", असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना फक्त पक्ष नाही, सेना एक कुटुंब आहे आणि बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आजही उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करत आहेत, असंही राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा