Uddhav Thackeray Latest News: 'मत बनवणं आणि मत मागणं यात फरक आहे. तुम्ही मतं बनवणारी लोक आहात. त्यामुळे तुमचं महत्त्व फार मोठं आहे. जिथे आम्ही पोहोचू शकत नाही. तुमचं महत्त्वाचं काम काय आहे, तर जनतेला भ्रमातून बाहेर काढणं', असे सांगत उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या काळात केल्या जाणाऱ्या घोषणांबद्दल भाष्य केले. मुद्दा मांडताना त्यांनी एक उदाहरण दिले.
मुंबईत वज्र निर्धार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
"मी तुम्हाला चंद्रावर घर देईन. तुम्ही काय बोलाल?"
उद्धव ठाकरे म्हणाले, "असं धरून चला की ही प्रचाराची सभा आहे आणि आम्ही सगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते इकडे आलेलो आहोत. मी जर तुम्हाला सांगितलं की, तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन. तुम्ही काय बोलाल?", असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थितांनाही विचारले की, "तुम्ही देताय का?"
ठाकरे पुढे म्हणाले की, "मी तुम्हाला चंद्रावर घर देतो, असे म्हणालो की, मग तुम्ही विचार काय करता; अरे चंद्रावर घर मिळणार नाही हे मला पण माहितीये. सगळे नाही बोलत आहेत. पण हा हो बोलतोय. मग त्यांना दिलं तर मिळणार नाहीच. पण याला दिलं तर... हा हो बोलतोय. एकदा देऊन बघून ना. मिळालं घर तर...?", असे उदाहरण ठाकरेंनी दिले.
ते घशात अडकलेलं हाडूक झालं -उद्धव ठाकरे
"निवडून दिल्यानंतर मग निवडणुकीच्या काळात असे जुमले करावेच लागतात. मग त्यांचं अच्छे दिन आयेगें. ते घशात अडकलेलं हाडूक झालं. आश्वासनांची हाडं घशात अडकायला लागली, कसे चालणार असे. ही सगळी जमुलेबाजी. यात लोक सुद्धा बघतात की, करायचं काय?", असे ठाकरे उपस्थितांना म्हणाले.