मुंबई - राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाही, असे उदगार अजित पवार यांनी काढले आहेत.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष झाल्याप्रित्यर्थ महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाही, उद्धव ठाकरेंच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार म्हणाले.
"उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की कोरोना त्यांच्या आसपासही फिरकला नाही’’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 7:04 PM
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष झाल्याप्रित्यर्थ महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही.महाराष्ट्र थांबणार नाही.' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला.
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात एवढा अभ्यास केला ती त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेतत्यामुळेच कोरोना विषाणू त्यांच्या आसपासही फिरकला नाहीउद्धव ठाकरेंच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत झाली