शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशाला उध्दव ठाकरेंचा हिरवा कंदील..? आशा बुचकेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 8:50 PM

शरद सोनवणे यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारण देखील करण्यात आले होते.

ठळक मुद्देराजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिका-यांची उध्दव ठाकरे यांनी काढली हवा

पुणे : राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील,असे दबावतंत्र वापरून जि.प.गटनेत्या आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या भेटीस गेले होते. मात्र, ठाकरे यांनी या सर्व पदाधिका-यांची चांगलीच कानउघडणी केल्याने कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिका-यांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आ.शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. सोनवणे यांनी  शिवसेनेत प्रवेश केला तर आशाताई बुचके ह्या नेमक्या काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  दरम्यान,शरद सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांना मातोश्रीवर बोलविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. शरद सोनवणे यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारण देखील करण्यात आले होते. सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशा बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेत आ.सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच अनेक पदावर काम करणा-या शिवसैनिकांनी सामुहिकरित्या आपल्या पदाचा राजीनामा देतील अशा तीव्र शब्दांत आपला पवित्रा जाहीर केला होता.  येत्या आठ दिवसात जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी असलेले माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, संभाजी तांबे, राजाभाऊ गुंजाळ, नगराध्यक्ष षाम पांडे व काही निवडक पदाधिका-यांना मातोश्रीवर बोलावून आ.सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिका-याने नाव न छापण्याचे अटीवर दिली आहे. जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिका-यांची उध्दव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आ.सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशा बुचके यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

टॅग्स :Junnarजुन्नरPuneपुणेShiv SenaशिवसेनाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण