शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 5:50 PM

कोरोना संकटावर भाष्य करताना गडकरींनी सांगितला चार दशकांपूर्वीचा किस्सा

मुंबई: धडाकेबाज निर्णय, अफाट कार्यक्षमता यामुळे केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी कायम चर्चेच असतात. कोरोना लढ्याचं नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली. त्यामुळे गडकरी पुन्हा चर्चेत आले. सर्वच पक्षांमध्ये गडकरी यांचे उत्तम संबंध आहेत. गडकरी यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांची टास्कमास्टर अशी ओळख आहे. मात्र एक काळ असा होता की नितीन गडकरींना अनेकांनी पक्ष सोडण्याचा सल्ला दिला होता. खुद्द गडकरींनीच हा प्रसंग देशातील विविध कुलगुरुंशी संवाद साधताना सांगितला.काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, "नरेंद्र मोदींना सोयरसुतक नाही; नितीन गडकरी पंतप्रधान हवेत"कोरोना परिस्थितीचा सामना करताना आपल्याला संकटांना तोंड द्यायचं आहे. आपल्याला हा लढा लढायचा आहे असं म्हणताना गडकरींनी १९८० मधील एक आठवण सांगितली. “मी विद्यार्थी परिषदेमधून भाजपमध्ये आलो. १९८० चा कालवधी होता. अटलजी निवडणूक हरले होते. आमच्या पक्षाची परिस्थिती बिकट होती. तेव्हा सर्वजण निराश होते. जनता पार्टीनंतर एवढा मोठा पराभव झाल्यानं अटलजी, अडवाणीजींना काही भविष्य नाही. या पक्षालाही काही भविष्य नाही. हा पक्ष संपला आहे. या पक्षाला काही आधार नाही, अशी टीका करण्यास पत्रकारांनी सुरुवात केली होती,'  असं गडकरींनी सांगितलं.“नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा या सर्व परिस्थितीमध्ये मलाही अनेकदा निराशा झाल्यासारखं वाटायचं असंही गडकरी म्हणाले. 'तेव्हा मलाही अनेकदा निराश झाल्यासारखं व्हायचं. लोक म्हणायचे तू चांगला आहेस. पण पक्ष चांगला नसल्याने इथे तुझं भविष्य चांगलं नाही. त्यामुळे तू पक्ष बदल असा सल्ला काहींनी दिला. पण पक्ष आमचा आहे, विचार आमचे आहेत. त्यामुळे पक्षासोबतच राहण्याची भूमिका मी घेतली,' असं गडकरींनी सांगितलं.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी