नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य करताना रडारवर केलेल्या विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी यावरुन मोदींवर निशाणा साधला. यानंतर आता उत्तर मुंबई मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही मोदींना टोला लगावला. मातोंडकर यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर शरसंधान साधलं. उर्मिला यांनी त्यांच्या कुत्र्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो डोंगरावर काढण्यात आला आहे. 'आकाश निरभ्र असल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. यामुळे माझा कुत्रा रोमियोच्या कानापर्यंत रडारचे सिग्नल अगदी स्पष्टपणे पोहोचतील,' असं उर्मिला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी या ट्विटसोबत एक फनी इमोजीदेखील जोडला आहे.
बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:07 IST