शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पंजाबमध्ये काँग्रेसचा जयजयकार तर भाजपाची हार, निकालांनंतर उर्मिला मातोंडकरचे हे ट्वीट होतेय व्हायरल

By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 4:11 PM

Shiv Sena leader Urmila Matondkar tweet on farmer Protest goes viral punjab local body elections 2021 results : पंजाबमध्ये आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे.

ठळक मुद्देपंजाबमधील निकालानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेता असलेल्या उर्मिला मातोंडकर हिचे एक ट्विट व्हायरल उर्मिला मातोंडकर हिने पंजाबमधील भाजपाच्या पराभवाचा थेट शेतकरी आंदोलनाशी जोडला संबंध पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जनादेश स्पष्ट आहे

मुंबई  - पंजाबमध्ये आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. (punjab local body elections 2021 results) यामध्ये सात महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपा (BJP) आणि अकाली दल (Akali Dal) या विरोधी पक्षांची दाणादाण उडवली आहे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवर शेतकरी आंदोलनाचा (farmer Protest) प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंजाबमधील निकालानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेता असलेल्या उर्मिला मातोंडकर हिचे एक ट्विट व्हायरल होत आहे. (Urmila Matondkar's tweet goes viral )

पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालावर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर हिने म्हटले आहे की, ‘#PunjabMunicipalElection2021 चा जनादेश स्पष्ट आहे. #FarmersMakelndia', अशा प्रकारे उर्मिला मातोंडकर हिने पंजाबमधील भाजपाच्या पराभवाचा संबंध थेट शेतकरी आंदोलनाशी जोडला आहे. त्यामुळे हे ट्विट आजच्या दिवसात चर्चेचा विषय ठरले आहे.  केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने त्यांना महत्त्व आले होते. दरम्यान, पंजाबमधील या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला आहे. काँग्रेसने मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि भटिंडा येथील महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे. भटिंडा महानगरपालिकेत तर काँग्रेसने तब्बल ५३ वर्षांनंतर विजय मिळवला आहे, त्यामुळे या विजयाला विशेष महत्त्व आहे.

टॅग्स :Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरPoliticsराजकारणPunjabपंजाबElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस