मनोहर कुंभेजकर, मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचा मुलुख गाजवणार आहेत. योगी हे मुंबईसह राज्यात सुमारे 8 ते 10 जाहिर प्रचारसभा घेणार आहे. आक्रमक वक्तृत्वा साठी ते प्रसिद्ध आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगी यांनी महाराष्ट्राच्याअ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी येथे येण्यासंदर्भात मुंबई प्रदेश भाजप महामंत्री व दादासाहेब फाळके चित्रनगरीचे उपाध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा)अमरजीत मिश्रा यांनी मुख्यमंत्री योगी यांची लखनऊ येथे भेट घेऊन सविस्फार चर्चा केली.आणि त्यांनी महाराष्ट्रासह मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा घेण्याचे लगेच मान्य केले अशी माहिती मिश्रा यांनी लोकमतशी बोलताना दिली.
महाराष्ट्राचे व उत्तरप्रदेशचे संबंध चांगले असून आदित्य योगी यांनी उत्तरप्रदेश मध्ये येथील माजी राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत सांताक्रूझ येथे मिश्रा यांनी आयोजित महाराष्ट्र दिन आणि गेल्या 24 जानेवारीला उत्तर प्रदेश दिन सांताक्रूझ येथे उत्साहात हजारोच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला होता. खास कुंभमेळ्याला आदित्य योगी यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयागला गेले होते आणि नंतर अलिकडेच त्यांनी गंगा स्नान करून काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले याची आठवण अमरिजित मिश्रा यांनी करून दिली.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 5 वर्षचा कार्यकाळा वर आधारित " मॅन ऑफ़ मिशन महाराष्ट्र " पुस्तक भेट म्हणून दिले. अशी माहिती त्यांनी दिली.