नवी दिल्ली : वेल्लोर लोकसभा मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे येथे दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान निवडणूक आयोगाने रद्द केले. या कारवाईसाठी आयोगाने केलेल्या शिफारशीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली.मोठ्या प्रमाणात अनधिकृत रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारू, सोन्याचांदीच्या दागिन्यांसह मोफत भेटवस्तूंचे आमिष येथील मतदारांना दाखविण्यात येत असल्याचाअहवाल आयोगाला मिळाला होता. आतापर्यंत जप्त केलेल्या२२५0 कोटींच्या अनधिकृत रोख रक्कमेपैकी केवळ तामिळनाडूतून ४९४ कोटी रोकड आयोगाने जप्त केली आहे. आयोगाने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे वेल्लोरमधील मतदान रद्द करण्याची शिफारस केली होती.
वेल्लोरची निवडणूक झाली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:47 AM