राज्यसभेत (Rajya Sabha) पावसाळी अधिवेशनावेळी 11 ऑगस्टला आणि त्याआधी 10 ऑगस्टला झालेल्या धक्काबुक्की आणि गोंधळाचे प्रकरण अद्याप संपलेले नाही. विरोधक आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, याचबरोबर आपली बाजू देखील मांडत आहेत. आता राज्यसभेत मार्शलांवर (Rajya Sabha Marshal) विरोधकांनी जे आरोप लावले होते, त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. (Opposition Leaders Meet Venkaiah Naidu Day After Rajya Sabha Uproar)
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आरोप केला होता की, राज्यसभेत जेवढे सदस्य नव्हते त्यापेक्षा जास्त संख्येने मार्शल हजर होते. पुरुष मार्शलांन महिला खासदारांनाही धक्काबुक्की केली. हे मार्शल संसदेतील नव्हते तर बाहेरील होते. यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधकांनी भेट घेतली होती. 10 ऑगस्टपासूनच राज्यसभेत अधिक संख्येने सुरक्ष रक्षक तैनात केले होते, जे सामान्य कामकाजाच्या दिवशी कधीही तिथे नव्हते.
यावर नायडू यांनी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. संसदेच्या स्टाफने यावर खुलासा पाठविला आहे. 10 ऑगस्टला कोणत्याही बाहेरील व्यक्तीला मार्शल म्हणून तैनात करण्यात आले नव्हते. लोकसभेत आणि राज्यसभेत फक्त लक्ष ठेवण्यासाठी आणि वॉर्ड स्टाफ असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्शल म्हणून तैनात केले होते. मार्शल किती असावेत किंवा ठेवावेत याची संख्या गरजेनुसार ठरविली जाते. हे मार्शल 14 ते 42 एवढ्या संख्येने असू शकतात. सर्वकाही कामकाजावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे अहवालात म्हटले आहे.
जखमी झालेल्या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फुलोदेवी नेताम यांनी सांगितले की, जेवढे खासदार नव्हते तेवढे मार्शल होते. पुरुष मार्शलने धक्का मारला. यामुळे जखमी झाले. डॉक्टरांनी पेनकिलर दिली तेव्हा बरे वाटले. अन्य महिला खासदारांनी सांगितले की, आमच्यापेक्षा तिप्पट संख्येने मार्शल होते. उभे रहायलाही जागा नव्हती. वेलमध्ये जाण्यासाठीही जागा नव्हती, अशावेळी पुरुष मार्शलनी धक्काबुक्की सुरु केली. यामध्ये महिला खासदार पडली.