Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 10:53 AM2021-04-12T10:53:29+5:302021-04-12T11:38:59+5:30

Pandharpur By Elections: या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

Video: BJP Devendra Fadnavis Target Thackeray government in Pandharpur by-election campaign | Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहेलोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही.

पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे. यात कोणाला यश मिळणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.(BJP Devendra Fadnavis Target Thackeray government over Lockdown in Maharashtra)  

परंतु या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणूक ही जनतेसाठी एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून वसुली करण्यासाठी सरकार काम करतंय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होतायेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होतायेत. ही अवस्था या सरकारने करून ठेवली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असलं तरी जेव्हा लॉकडाऊन करतो तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचं भान सरकारला नाही. सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारनं मदत केलीच नाही पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

दरम्यान, निवडणूक असल्यामुळे पंढरपूर परिसरात वीज कनेक्शन कापण्यात येत नाही. परंतु १७ तारखेनंतर जर पंढरपूर मतदारसंघात सरकारने वीज कनेक्शन कापलं नाही तर माझं नाव बदलून टाका. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपाने गदारोळ केल्यानंतर वीज कनेक्शन कापणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर शेवटच्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली. हे सरकार लबाड आहे. सरकारने बिल्डरांना ५ हजार कोटींची सूट दिली परंतु शेतकऱ्यांकडून ५ हजार कोटींची वसुली सरकारने केली. अजितदादा खूप काही बोलतील पण हे लबाडांचे अवसान घेतायेत. सरकारने एक नवा पैसा पंढरपूरला दिला नाही. भाजपा सरकारच्या काळात दुप्पटीने सोलापूर जिल्ह्याला पैसा दिला असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत केला.

Web Title: Video: BJP Devendra Fadnavis Target Thackeray government in Pandharpur by-election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.