शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

VIDEO: मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणकरांनी मांडल्या तीव्र शब्दात व्यथा, केली अशी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:01 IST

Chiplun Flood Update: उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला भेट देऊन शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणवासियांनी मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र शब्दांत आपल्या वेदना मांडल्या.

चिपळूण - मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी प्रचंड वित्तहानी झाली आहे. शहरातील बाजारपेठ पुरामुळे कोलमडली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला भेट देऊन शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणवासियांनी मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र शब्दांत आपल्या वेदना मांडल्या. (Chiplunkar's express their grief in sharp words in front of the Chief Minister Uddhav Thackeray)

पुराच्या काळात आम्हाला मदत मिळाली नाही. पूरपरिस्थितीदरम्यान, मदतीसाठी झालेल्या उशिरासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी चिपळूणवासियांनी केली. तसेच पुरामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. आम्हाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकदा कर्जमाफी द्या आणि दोन टक्के दराने कर्ज द्या अशी विनंती चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला तुमच्या पायावर कसे उभे करायचे याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे सांगितले. 

चिपळूणमध्ये पुरामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक हानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री आज सकाळी मुंबईहून गुहागर येथे आले. तेथून ते रस्ते मार्गाने चिपळूणमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल होताच त्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले.  मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते होते. चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठकही घेणार आहेत.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार