शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

Video: डी के शिवकुमार यांनी नेत्याच्या कानशिलात लगावली; कर्नाटकातील राजकारण तापले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 7:28 PM

Congress leader DK Shivakumar loses cool: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी (BJP national General Secretary CT Ravi) हा व्हिडीओ ट्विट करत राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे.

बंगळुरू: कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार (DK Shivakumar) यांनी शनिवारी त्यांच्या रॅलीमध्ये असलेल्या एका नेत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. एक व्यक्ती सेल्फी घेत होता. तो त्या नेत्याचा शिवकुमार यांच्यासोबत फोटो काढत होता. अशावेळी त्या नेत्याने शिवकुमार यांच्या बाजुला चिकटून चालत असताना कंबरेला हात लावण्याचा प्रयत्न केला. यावरून शिवकुमार चिडले आणि त्याच्या कानशिलात मारत चांगलेच सुनावले. (Congress leader DK Shivakumar loses cool, slaps party worker who tried to put hand over his shoulder)

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच, भाजपाने शिवकुमार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. थेट राहुल गांधी यांना टॅग करत शिवकुमार यांना हिंसा करण्याचे लायसन दिलेय का, असा सवाल केला आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये डी के शिवकुमार हे त्या व्यक्तीवर जवळ येणे आणि स्पर्श करण्यावरून संतापलेले दिसत आहेत. तुम्हाला जबाबदारीने वागायला हवे, असे ते रागात त्या नेत्याला बोलताना दिसत आहेत. हा नेता काँग्रेसचाच स्थानिक नेता होता. शिवकुमार यांनी याचे शुटिंग करणाऱ्या कॅमेरामनला ते फुटेज डिलीट करण्यास सांगितल्याचा दावा पीटीआयने केला आहे. ही घटना मांड्याच्या जिल्हा मुख्यालय भागातील आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी (BJP national General Secretary CT Ravi) हा व्हिडीओ ट्विट करत राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे. शिवकुमार हे कोतवाल रामचंद्रचे अनुयायी आहेत, असेही त्यांनी म्हटले. कोतवाल रामचंद्र हा १९७० ते १९८० च्या दशकात बंगळुरुचा अंडरवर्ल्ड डॉन होता. त्याची शहरभर मोठी दहशत होती. कोतवाल रामचंद्राचे पूर्व शिष्य पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत असे वागत असतील तर सामान्यांसोबत कसे वागतील? याची कल्पनाही न केलेली बरी. शिवकुमार यांना मारहाणीचे लायसन दिलेय का, असा सवालही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी