Video: बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी; चोर म्हटल्याने निमित्त झाले

By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 05:32 PM2020-11-13T17:32:58+5:302020-11-13T17:33:29+5:30

Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे.

Video: A ruckus erupted between Congress MLAs in Bihar | Video: बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी; चोर म्हटल्याने निमित्त झाले

Video: बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी; चोर म्हटल्याने निमित्त झाले

googlenewsNext

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसत नाही तोच अवघ्या 19 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये नेता कोण बनणार यावरून तुंबळ हाणामारी पहायला मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांमध्येच हा राडा झाला आहे. 


बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे. तर दुसरीकडे राजदने एनडीएतील मित्रपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला आहे. अशातच काँग्रेसनेही आज नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली होती. 


काँग्रेस आमदारांच्या या बैठकीत शुक्रवारी मोठा राडा झाला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्याने मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटांत मोठा राडा झाला आणि शिवीगाळही करण्य़ात आली. 


महाराजगंजहून आमदार विजय शंकर दुबे आणि विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसच्या गटनेता कोण होणार यावरून बाचाबाची झाली. यावेळी सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेंना चोर म्हटले. यामुळे संतापलेल्या झालेल्या दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. 




यानंतर नेत्यांमध्ये राडा झाल्याचे कळताच बाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यांनीही बैठकीकडे धाव घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


"आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं; पुन्हा मतमोजणी करा", तेजस्वी यादवांची मागणी
 बिहारनिवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले आहे. तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली आहे. 

"जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2015 मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे. 

Web Title: Video: A ruckus erupted between Congress MLAs in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.