Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला. यावर भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देत काही फरक पडत नसल्याचे सांगितले. (Ravi Rana snatched Rajdand, Bhaskar jadhav said let him go from Vidhan sabha monsoon session.)
Vidhan Sabha Adhiveshan: भाजपाच्या प्रतिविधानसभेतील माईक काढून घेतले; विधानसभा अध्यक्षांचे आदेश
रवी राणा यांनी राजदंड पळविताच मार्शल कुठे आहेत, त्यांना सभागृहाबाहेर काढा असे म्हणत राजदंड पळविला म्हणून सभागृहाचे कामकाज थांबणार नाही. रवी राणा शेतकऱ्यांबाबतची चर्चा सुरु आहे. तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल, तुमचे म्हणणे मांडायचे असेल तर तुम्ही थांबू शकता, असे सांगितले. अध्यक्षांच्या दालनात झालेली धक्काबुक्की, शिवीगाळवरून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. या विरोधात भाजपाने प्रतिविधानसभा भरविली आहे. तेथे स्पीकरवर भाषणबाजी केली जात आहे. गोपनिय कागद वाटले जात आहेत. माजी आमदार पुरोहीत देखील ते वाटत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी बाहेर वाटत असलेली कागदपत्रे, माईक जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे आमदारांना फक्त पीएला घेऊन येण्याची परवानगी आहे. माजी आमदार कसे फिरू शकतात, असा सवाल त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांना दिलेली कागदपत्रे त्यांचे आमदार वाटत आहेत. त्यांना विचारले असता ते अध्यक्षांची परवानगी घेऊनच वाटत असल्याचे सांगितले. परवानगी दाखव म्हटल्यावर ते दाखवू शकले नाहीत. ही कागदपत्रे, स्पीकर जप्त करण्याची मागणी करतानाच या कृत्यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली होती. पृथ्वीराज चव्हाणांनी जोवर त्या प्रतिविधानसभेवर कारवाई होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज थांबविण्याची मागणीक केली. तसेच अन्य एका आमदारांनी सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्याचेच निलंबन करण्याची मागणी केली आहे. यानंतर विरोधकांचा माईक काढून घेण्यात आला.