शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

वासनिक म्हणाले, ‘सॉरी’ दुखावण्याचा हेतू नव्हता; लेटरबॉम्ब टाकणाऱ्यांची आज तलवार म्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 1:22 AM

कार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली.

विकास झाडे

नवी दिल्ली : कॉँग्रेस कार्यसमितीच्या सात तास झालेल्या बैठकीत बराच वेळ हा रविवारी वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या लेटरबॉम्बवर गेला. कॉँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी त्यांच्याकडून झालेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून असे अनवाधानाने घडले, कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता अशी खंत त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज बैठकीत पक्षाचे कोषाध्यक्ष अहमद पटेल यांनी या तिन्ही नेत्यांच्या कृतीची निंदा करीत यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती याकडे लक्ष वेधले, त्यावेळी गुलाम नबी आझाद यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु मुकुल वासनिक यांनी माझ्याकडून अनवधानाने असे झाले असल्याचे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आनंद शर्मा यांनीही वासनिकांच्या सुरात सूर मिळवला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आज यावर भाष्य करण्याचे टाळले.

कार्यसमितीचे कायम आमंत्रित सदस्य खा. राजीव सातव यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बाजू लावून धरली. पक्षात सामूहिक नेतृत्वातून निर्णय घेतले जात नाहीत या आरोपाचा सातव यांनी बैठकीत चांगलाच समाचार घेतला. मी गुजरातचा प्रभारी आहे या काळात पक्षश्रेष्ठींनी कोणताही निर्णय घेताना मला आणि प्रदेशाध्यक्षांनाच विचारून घेतला आहे. महाराष्ट्रात प्रभारी आणि प्रदेश अध्यक्षाला वगळून कोणते निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतले ते टीकाकारांनी सांगावे. असे कोणतेही राज्य नाही की, तेथील प्रदेश अध्यक्ष आणि प्रभारीला न विचारता निर्णय घेतले जातात. दहा वर्षे डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते, हे सरकार सामुहिक नेतृत्वातून चालले नाही का? ज्यांनी आता पक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आधी मंत्रिपदेही भोगले आहे. त्यांचे पक्षासाठी किती योगदान होते? याचे मुल्यमापन व्हायला नको का? असा सवालही खा. सातव यांनी उपस्थि केल्याचे सुत्राने सांगितले. आपण बैठकीत दिलगिरी व्यक्त केली का? असे ‘लोकमत’ने एसएमएसद्वारा मुकुल वासनिक यांना विचारले असता त्यांनी उशिरा ‘नो’ असे उत्तर दिले.उत्तम नेतृत्वकार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली. कॉँग्रेस एकसंघ ठेवण्याचे आणि सामूहिक नेतृत्व देण्याचे कौशल्य केवळ त्यांच्यातच आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीMukul Wasnikमुकूल वासनिक