कोलार : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. मोदी यांनी ३0 हजार कोटी रुपये चोरुन त्यांचे मित्र अनिल अंबानी यांना दिल्याचा राफेल विमानाच्या सौद्यावरून त्यांनी आरोप केला.कर्नाटकातील कोलार येथील एका रॅलीमध्ये राहुल यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांच्या सर्वच नावांमध्ये मोदी कसे असा प्रश्न करून राहुल यांनी नीरव असो, ललित असो वा नरेंद्र सारेच मोदी भ्रष्टाचारी निघाले, अजून असे किती मोदी पुढे येतील ते, समजत नाहीत, अशी टीका केली.नीरव, ललित, मेहुल चोकसी, मल्ल्या, अनिल अंबानी यांच्यासोबत नरेंद्र मोदीसह साºयाच चोरांची एक टोळी आहे. स्वत:ला चौकीदार समजणारे मोदी आता शेतकरी, रोजगार आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलतच नाहीत.तुम्ही कधी शेतकºयाच्या, कामगाराच्या आणि बेरोजगार व्यक्तीच्या घराबाहेर चौकीदार पाहिला आहे का? पण हे चौकीदार मात्र १५-२० धनदांडग्यांची चौकीदारी करता आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, अशी मोहीम यापूर्वीच सुरू केली होती. गेल्या वर्षी नोव्हेबंर महिन्यात राजस्थानात झालेल्या रॅलीत राहुल यांनी चौकीदार चोर है, अशी देशाची नवी मोहीम असेल, असे म्हटले होते. मोदीजी म्हणाले होते, मला एकवेळ पंतप्रधान बनवू नका, पण देशाचा चौकीदार करा, परंतु सत्तेत येताच पंतप्रधानांनी त्यांचे शब्द फिरविले आणि लोकांचा विश्वास गमावला, अशी टीकाही त्यांनी केली.काँग्रेस जर सत्तेत आली, तर संसदेत आणि विधानसभेबरोबरच सरकारी नोकरीतही महिलांना ३३ टक्के आरक्षण देईल, अशी घोषणा यावेळी राहुल यांनी केली. राहुल गांधी यांनी या रॅलीत न्याय योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, या योजनेंतर्गत जवळपास पाच कोटी परिवारांच्या खात्यात वार्षिक ७२ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल. पक्षाने जाहीरनाम्यात याची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले.
चौकीदार शतप्रतिशत चोर; राहुल गांधी यांचे कर्नाटकात टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 3:44 AM