तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो; देवेंद्र फडणवीस झाले चीतपट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 01:43 PM2020-12-04T13:43:06+5:302020-12-04T13:53:11+5:30
Devendra Fadnavis And Maharashtra Legislative Council polls : भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. एकट्या भाजपा विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजपा 1 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
"तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं" असं देखील फडणवीस म्हणाले.
The results of Maharashtra Legislative Council polls are not as per our expectations. We were expecting more seats but won only one. We miscalculated the combined power of the three parties (Maha Vikas Aghadi): Devendra Fadnavis, BJP leader & former Maharashtra CM pic.twitter.com/KtzuS7OwQn
— ANI (@ANI) December 4, 2020
आमचा एकतरी आला; विधान परिषद निकालांवरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला डिवचले आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसं ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला आहे. तसेच राज्यात एकच जागा जिंकता आल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही बेसावध राहिल्याची कबुली दिली आहे. यामुळेच निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपाची पिछेहाट अजिबात नाही, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील ट्विट करत भाजपावर निशाना साधला आहे. थेट जनतेतून मतदान झालेल्या पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये भाजपाची धुळधाण झाली आहे. ही महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आहे, अशी टीका केली आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपाचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला डिवचले आहे. https://t.co/5IXVGxB9lv@ShivSena@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra#VidhanParishad
— Lokmat (@MiLOKMAT) December 4, 2020