कोरोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये, जे पक्ष राजकारण करतात त्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे किंवा कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नव्हते. या विनंतीवर देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही राजकारण थांववतो असे आश्वासन देत एक अट ठेवली आहे. (We will stop Politics on Corona; Devendra Fadanvis ask CM Uddhav Thackreay)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadanvis) उद्देशून देवेंद्रजी तुम्ही काल नव्हता, नाहीतर कालच निर्णय झाला असता, यामुळे आज बैठक बोलावल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मधला मार्ग काढावा, मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त दोन ते तीन लोकांनी माहिती द्यावी, जास्त लोक बोलत राहिले तर लोकांचं कन्फ्युजन होतं, असा मुद्दा अशोक चव्हाणांनी मांडला आहे.
Lockdown: देवेंद्र फडणवीस नव्हते, नाहीतर कालच निर्णय झाला असता; उद्धव ठाकरेंचे बैठकीत वक्तव्य
तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही, असे म्हटले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठेवली आहे.
या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे बैठकीला हजर आहेत.
कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कळत नकळत कोरोनाचा प्रसार होतोय आणि हे सर्वात घातक आहे. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होतेय. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असंही मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.