शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

किरीट सोमय्यांना विरोधच, आता भाजपाचे दिल्लीतील नेते निर्णय घेतील- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 2:40 PM

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

मुंबई- ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसैनिकांच्या विरोधामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी रखडली आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, भाजपाशी आमचं भांडण नाही, ईशान्य मुंबईत युतीचाच उमेदवार विजयी होईल.आधीच्या खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्यं शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांवर केली होती, ती योग्य नव्हती. टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कोणत्या भाषेचा वापर करता याचाही विचार करायला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना  त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केलेले आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी, यासाठी सोमय्या प्रयत्नशील आहेत. मात्र, उद्धव यांनी भेट नाकारून सोमय्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि शिवसेना नेतृत्वावर खालच्या पातळीवर जात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांचा सोमय्यांच्या उमेदवारीवर आक्षेप आहे. ‘एकच स्पीरिट, नो किरीट’ अशी नारेबाजीही शिवसैनिकांनी सुरू केली आहे.ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर सोमय्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून शिष्टाईसाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. लाड लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यासाठीच ते मातोश्रीवर दाखल झाल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपा नेते मनोज कोटक, प्रवीण छेडा आदी नावांमध्ये आता लाड यांच्या नावाचा समावेश झाल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहेत.मातोश्री भेटीबाबत लाड म्हणाले की, युतीबाबतच्या काही कामांसाठी मी येथे आलो होतो. सोमय्यांच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील. युतीत कसलाच तणाव अथवा मतभेद नाहीत. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. सोमय्यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेले नाट्य आणखी काही दिवस चालेल असे दिसते आहे. या मतदारसंघाबाबत शेवटच्या टप्प्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र, राऊत यांचे विधान पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना