West Bengal Election : बरमुडा परिधान करण्याच्या वक्तव्यावर दिलीप घोष यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "महिलांनी... "
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:41 PM2021-03-25T17:41:03+5:302021-03-25T17:43:13+5:30
West Bengal Election 2021 : एका सभेदरम्यान, ममता बॅनर्जींबाबत दिलीप घोष यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता एकमेकांवर आरोप करताना नेते मंडळी वादग्रस्त विधाने करायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली. ममता बॅनर्जी यांनी साडी नाही, तर बरमुडा घालावा, असे विधान भाजप नेत्यानं केलं होतं. त्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. दरम्यान यानंतर दिलीप घोष यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (west bengal assembly election 2021 bjp leader dilip ghosh made disputed statement on mamata banerjee)
"त्या (ममता बॅनर्जी) आमच्या मुख्यमंत्री आहेत. त्या बंगालच्या संस्कृतीप्रमाणेच योग्य काम करतील अशी आम्ही अपेक्षा करतो. महिलांनी साडी परिधान करून पाय दाखवणं अयोग्य आहे. लोकं त्यावर आक्षेप घेत आहेत. मला ते आक्षेपार्ह वाटलं म्हणून मी त्यावर बोललो," असं स्पष्टीकरण दिलीप घोष यांनी दिलं.
She's our CM, we expect her to act appropriately, befitting Bengal’s culture. A woman showing her legs in saree is inappropriate. People are objecting. I found it objectionable so i spoke: WB BJP Chief on his reported remark that CM should wear bermuda shorts to show injured leg pic.twitter.com/7xSFdbKTgr
— ANI (@ANI) March 25, 2021
काय म्हणाले होते घोष?
"प्लास्टर कापलेले आहे. क्रॅप बँडेज बांधलेले आणि पाय वर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेलं कधीच कुणाला पाहिलेलं नाही. तर मग बरमुडा का परिधान केला नाही, असं धक्कादायक विधान दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींवर टीका करताना केलं होतं.
या माकडांना वाटते ते बंगाल जिंकतील?
टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्वीट करून दिलीप घोष यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असं घोष यांनी म्हटलं आहे आणि या माकडांना वाटतं आहे की, ते बंगालमध्ये जिंकतील? अशी विचारणा महुआ मोईत्रा यांनी केली.