West Bangal Election 2021: पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना केली महत्वाची सूचना, म्हणाले जपून बोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 09:38 PM2021-03-05T21:38:31+5:302021-03-05T21:40:03+5:30
West Bangal Election 2021, Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी पक्षाच्या मुख्यालयात महत्वाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत प.बंगालमधील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण (west bengal assembly election)आता चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी देखील केलीय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प.बंगालमधील भाजप नेत्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. प्रचारसभांमध्ये बोलताना जपून आणि चुकीचं शब्द न वापरण्याच्या कडक सूचना मोदींनी भाजप नेत्यांना दिली आहे. (West Bangal Election 2021 PM Narendra Modi gave important instructions to BJP leaders said speak carefully)
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी पक्षाच्या मुख्यालयात महत्वाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत प.बंगालमधील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष काही नवीन गोष्ट नाही. दोन्ही पक्षांमधील तणावावरुन याआधी काही हिंसक घटना देखील झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूलचा सामना करताना प्रचारावेळी अपशब्द आणि नकारात्मकता निर्माण करणं वक्तव्य टाळण्याची सूचना मोदींनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा निवडणूक प्रचार अतिशय सभ्य पद्धतीनं होईल यावर काम करा, अशीही सूचना मोदींनी केली आहे.
दरम्यान, भाजपच्या बैठकीला सुरुवात होण्याआधीच पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना प.बंगालमध्ये पक्षानं केलेल्या कामांची आणि चांगल्या गोष्टींची माहिती देण्याआधी तिथली प्रचाराची वस्तुस्थिती, कमतरता आणि पक्ष कुठं कमी पडतोय याची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. त्यानंतर बैठकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप करत असलेल्या सर्व प्रचार कामांची माहिती मोदींना देण्यात आली.