Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

By बाळकृष्ण परब | Published: May 3, 2021 05:34 PM2021-05-03T17:34:52+5:302021-05-03T17:41:51+5:30

Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

West Bengal Assembly Election 2021: BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end? | Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

Assembly Election 2021: बंगालमध्ये भाजपा हरला! मोदी-शाहांचा करिश्मा खरोखरच ओसरला?

Next
ठळक मुद्देसर्वतोपरी प्रयत्न करूनही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये जेमतेम ८० जागाही जिंकता आल्या नाहीतभाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि करण्यात येत असलेले दावे याच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या जागा फार कमी मात्र २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता अगदी पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी

- बाळकृष्ण परब 

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंदालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनेभाजपाला धोबीपछाड देत दणदणीत विजय मिळवला. (West Bengal Assembly Election 2021) बंगालमध्ये नरेंद्र  मोदींच्या (Narendra Modi) झंझावाती सभा आणि दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या अमित शाहांच्या ( Amit Shah) आक्रमक प्रचारानंतरही भाजपाला १०० जागाही जिंकता आल्या नाहीत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा करिश्मा ओसरल्याची तसेच भाजपाचे अच्छे दिन संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. ( BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end?)

२०१९ च्या लोकसभा निलडणुकीत पश्चिम बंगालमध्ये अनपेक्षित यश मिळाल्यानंतर भाजपाला बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पडू लागले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी बंगालवर लक्ष केंद्रीत केले. तसेच बंगालमधील सत्ताधारी असलेल्या ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले. ममतांचे निकटवर्तीय असलेल्या अनेक नेत्यांनाही भाजपात आणले. मात्र एवढे सर्व करूनही भाजपाला पश्चिम बंगालमध्ये जेमतेम ८० जागाही जिंकता आल्या नाहीत. भाजपाने बंगालमध्ये लावलेला जोर आणि करण्यात येत असलेले दावे याच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या जागा फार कमी आहेत. त्यामुळे मोदी, शाहांचा करिश्मा संपला असे दिसणे साहजिकच आहे.

मात्र २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकांशी तुलना केली असता अगदी पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये अस्तित्वातही नसलेल्या भाजपाने अल्पावधीत घेतलेली झेप लक्षवेधी आहे. या निवडणुकीत भाजपाला ७५ च्या आसपास जागा आणि ३७ टक्के मते मिळाली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला १८ जागा आणि ४० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. याचा अर्थ बंगालमध्ये भाजपाने आपला हक्काचा हिंदुत्वाच्या विचारावर आधारित मतदार उभा केला आहे, असा होतो. दुसरीकडे एकेकाळी बंगालमध्ये दीर्घकाळ सत्तेत राहणारे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच त्यांना फारशी मतेही मिळालेली नाहीत. त्यामुळे बंगालमधील विरोधी पक्षाची पूर्ण स्पेस भाजपाला मिळाली आहे. याचा भाजपाला भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे बंगालची निवडणूक भाजपा हरला तरी आता रातोरात भाजपाला उतरती कळा लागेल, असे म्हणणे थोडेसे घाईचे ठरेल. 

दुसरीकडे भाजपाने आसाममधील सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. येथे एनआरसीसारखे मुद्दे असतानाही भाजपाने २०१६ एवढ्याच जागा घेत विजय मिळवला. आसाममध्ये एआययूडीएफशी काँग्रेसने केलेली युती भाजपाच्या पथ्यावर पडली. तर दुसरीकडे दक्षिण भारतात केरळमध्ये भाजपाला करिश्मा दाखवता आला नसला तरी तामिळनाडूनमध्ये कमल हसन या प्रसिद्ध अभिनेत्याला भाजपाच्या उमेदवाराने पराभवाचा धक्का दिला. तर पाँडेचेरीमध्ये काँग्रेसचे आव्हान मोडून काढत एनडीए सत्तेवर आली आहे. त्याबरोबरच देशातील विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांपैकी, कर्नाटक, महाराष्ट्र गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांत भाजपाने विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपाचा बंगालमध्ये पराभव झाला असला तरी मोदी-शाहांचा करिश्मा ओसरला असे म्हणता. येणार नाही. मात्र पश्चिम बंगालच्या निकालांनी तगडा प्रतिस्पर्धी असेल तर मोदी-शाहांना रोखता येऊ शकते हे मात्र दाखवून दिले आहे. 
 

Web Title: West Bengal Assembly Election 2021: BJP loses in West Bengal! Did Narendra Modi- Amit Shah's charisma really end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.