ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारी आणि भाजपाला थेट भिडणार, नंदिग्राममधून निवडणूक लढवणार
By बाळकृष्ण परब | Published: March 5, 2021 03:00 PM2021-03-05T15:00:47+5:302021-03-05T15:02:52+5:30
west bengal assembly election 2021, Mamata Banerjee Will contesting from Nandigram : गेल्या १० वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळी भाजपाने कडवे आव्हान दिले आहे.
कोलकाता - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे (West Bengal assembly election 2021) बिगूल वाजले आहे. गेल्या १० वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळी भाजपाने कडवे आव्हान दिले आहे. सुवेंदू अधिकारींसारखे तृणमूल काँग्रेसच्या गोटातील अनेक बडे नेते भाजपात डेरेदाखल झाल्याने ममता बॅनर्जींसमोरील आव्हान कठीण बनले आहे. (Mamata Banerjee Will contesting from Nandigram) त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना एक मोठी घोषणा केली आहे. (Mamata Banerjee will face Suvendu Adhikari and BJP directly, contesting from Nandigram)
तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी करत भाजपात दाखल झालेल्या आणि या निवडणुकीत नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
याबाबतचा निर्णय जाहीर करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आज आम्ही २९१ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत आहोत. यामध्ये ५० महिला आणि ४२ मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. तर उत्तर बंगालमधील ३ जागांवर आम्ही उमेदवार देणार नाही. तसेच मी स्वत: नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
Today, we are releasing a list of 291 candidates which includes 50 women, 42 Muslim candidates. On 3 seats of north Bengal, we not putting up our candidates. I will contest from Nandigram: TMC Chief & West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/0bY1pxxlN1
— ANI (@ANI) March 5, 2021
मी ९ मार्च रोजी नंदिग्रामला जाणार आहे. तर १० मार्च रोजी मी हल्दिया येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.
I am going to Nandigram on 9th March. On 10th March, I will file the nomination at Haldia: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/JQhCxVE40l
— ANI (@ANI) March 5, 2021