शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार, पण...; राऊतांनी सांगितला 'ममता'पूर्ण 'एक्झिट पोल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 4:41 PM

West Bengal Assembly Election 2021: एकट्या ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी भाजपनं पूर्ण सत्ता मैदानात उतरवली; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

नाशिक: एका महिलेचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण सत्ता कामाला लावली आहे. या संघर्षात आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलानंदेखील असाच निर्णय घेतला आहे, असं राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shiv Sena MP Sanjay Raut on West Bengal Assembly Election 2021)'NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?'सध्या पश्चिम बंगालमध्ये महाभारत घडत आहे. एकट्या ममता बॅनर्जींविरोधात भाजपनं संपूर्ण सत्ता मैदानात उतरवली आहे. एका महिलेचा पराभव करण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात आहे. पण ममता बॅनर्जी सत्ता राखतील असा विश्वास वाटतो. भाजपच्या जागा वाढतील. पण त्यांना बहुमत मिळणार नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सत्ता राखण्यात यश येईल, असं राऊत यांनी सांगितलं.“हमाम में सब नंगे होते है”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवारमुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) काही दिवसांपूर्वीच आपल्या हाती घेतला. यानंतर आता कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडे देण्यात आला आहे. त्याबद्दल बोलताना एनआयएनं घाईघाईनं तपास हाती घेण्याची गरज नव्हती. मुंबई पोलीस दल तपास करण्यास सक्षम आहे. पण विरोधी पक्षाचं सरकार राज्यात असल्यानं केंद्राकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं राऊत म्हणाले.नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न दिसणार नाही. नाशकात पुढील वर्षी महापालिका निवडणूक होणार आहे. इथे आघाडी असो वा नसो महापौर शिवसेनेचात होणार आणि महापालिकेवर भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं नेतृत्त्व करावं याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. संपुआच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आतापर्यंत सोनिया गांधींनी उत्तमपणे सांभाळली. मात्र आता प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना सक्रिय राहता येत नाही. त्यांच्या जागी पवारांनी नेतृत्त्व हाती घ्यावं. ते विरोधकांचं नेतृत्त्व सक्षमपणे करू शकतात, असं राऊतांनी म्हटलं.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीBJPभाजपाSharad Pawarशरद पवारSonia Singhसोनिया सिंह