West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:38 PM2021-05-02T12:38:57+5:302021-05-02T12:59:04+5:30

West Bengal Election Result Highlight: यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अब की बार 200 पार म्हणत पश्चिम बंगालमध्ये जोरदार ताकद लावली होती. पश्चिम बंगालसाठी भाजपाने केरळच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते.

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: BJP eliminates Left, not TMC; trinamool 200 plus and Left 77 directly to zero | West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'

West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'

Next

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights : भाजपाने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (trinamool ongress) ममता बॅनर्जींनाच (Mamata banerjee) लक्ष्य केले होते. मात्र, त्याच्या उलटा खेळ झाला असून तृणमूल संपण्याऐवजी (left and congress) डावे आणि काँग्रेसच संपली आहे. कलांनुसार तृणमूलला 202 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर भाजपाला 87 जागांवर आघाडी दिसत आहे. मात्र, डाव्यांच्या पारड्यात भोपळा पडताना दिसत आहे. (Mamata banerjee TMC will be win on 200 plus seats, bjp 88 and left on zero)

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी


2016 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 210 जागा मिळाल्या होत्या. डाव्यांच्या आघाडीला 77 आणि भाजपाला 3 जागा मिळाल्या होत्या. तसेच अन्यला 4 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अब की बार 200 पार म्हणत पश्चिम बंगालमध्ये जोरदार ताकद लावली होती. पश्चिम बंगालसाठी भाजपाने केरळच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, भाजपाला ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काही संपविणे जमलेले नाहीय. उलट भाजपाने डाव्यांना आणि काँग्रेस आघाडीला संपविले आहे. डाव्यांच्या पारड्यात 77 वरून थेट शून्य पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा सुफडासाफ झाला आहे. भाजपाला 80-90 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालचे भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी हे ही नसे थोडके असे सांगत भाजपाच्या यशावर समाधान व्यक्त केले आहेत. सध्या तरी आकड्यांमध्ये भाजपाने डाव्यांना संपविल्याचे दिसत असले तरी देखील भाजपाने मैदानात तृणमूलच्या किती जागा पाडल्या हे पाहणेदेखील औत्युक्याचे ठरणार आहे. कारण स्वत: ममता बॅनर्जी यांची सीट धोक्यात आहे. सहा फेऱ्यांनंतरदेखील ममता या जवळपास 7000 मतांनी पिछाडीवर आहेत. ममतांचेच एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांच्या मतदारसंघात जाऊन लढण्याचा आणि सेफ विजयासाठी दुसऱ्या मतदारसंघातून उभे न राहण्याचा निर्णय ममता य़ांनी घेतला होता. यासाठी ममता यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडला होता. हा निर्णय ममता यांच्यावर भारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Web Title: West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: BJP eliminates Left, not TMC; trinamool 200 plus and Left 77 directly to zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.