शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
3
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
5
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
6
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
8
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
9
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
10
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
11
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
15
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
16
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
17
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
18
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

West Bengal Results 2021: ममतादीदींच्या तृणमूलने ओलांडला बहुमताचा आकडा; भाजपा 'नर्व्हस नाईंटी'त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:59 AM

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: ऐन निवडणुकीत एका छोट्या अपघातात जायबंदी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे.

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights : आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाची हाय व्होल्टेज सीट असलेल्या नंदीग्रामकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) जिंकणार की पडणार याकडे लक्ष लागलेले असतानाच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपाला खूप मागे टाकले आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होऊ लागल्याने तृणमूलच्या गोटात आनंदाचे वातावरण परतू लागले आहे. (TMC took lead in West bengal over BJP. Mamata banerjee is trailing from Nandigram.)

सध्याच्या कलांनुसार भाजपाला 98 जागांवर आघाडी मिळाली असून तृणमूल काँग्रेसला 188 जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच तृणमूलने भाजपाला जवळपास 90 जागांनी मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची गरज आहे. येथे 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले आहे. West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: TMC left behind BJP; but Mamata Banerjee trailing by 8106 votes 

 

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

दुसरीकडे ऐन निवडणुकीत एका छोट्या अपघातात जायबंदी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे. यामुळे सध्या बंगालमध्ये 'गड आला, पण सिंह गेला' अशी अवस्था होण्याची शक्यता दिसू लागली आहे. देशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे. 

देशभरात जवळपास 822 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली आहे, यापैकी नंदीग्राम ही अशी एकच सीट आहे जी या साऱ्यांवर भारी पडली आहे. कारण ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते. सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमच्या अब्दुल कबीर यांचा 81,230 मतांनी पराभव केला होता. हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. नंदीग्राममधून आठ जण निवडणूक लढवत आहेत. 

काय होती घटना...ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामयेथून शेतजमिन अधिग्रहण करण्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. जानेवारी 2007 मध्ये सीपीएमचे आंदोलक आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तर 14 मार्च 2007 या दिवशी नंदीग्राममध्ये 14 लोकांचा पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झाला. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा