Assembly Election Results Live: “संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि...”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे विशेष कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:19 PM2021-05-02T16:19:43+5:302021-05-02T16:27:00+5:30

West Bengal Assembly Election Results, पश्चिम बंगाल निवडणूक निकाल: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया देत ममता बँनर्जी यांचे कौतुक केले आहे.

West Bengal Assembly Election Results Live: Special thanks to Mamata Banerjee from MNS Raj Thackeray | Assembly Election Results Live: “संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि...”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे विशेष कौतुक

Assembly Election Results Live: “संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि...”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे विशेष कौतुक

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता.सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा व्यक्त करतोकलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्याच्यात खूप समानता आहे

मुंबई – पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यात थेट लढत पाहायला मिळत होती. बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जोर लावला होता. परंतु प. बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या हाती सत्ता देण्याचं ठरवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(MNS Raj Thackeray Reaction On West Bengal Assembly Election Results)  

या निवडणूक निकालाबाबत राज ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना म्हटलंय की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्याच्यात खूप समानता आहे असं ते म्हणाले.

त्याचसोबत राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठी आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ((Mamata banrejee)) यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने (TMC) विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election Result) सत्ता स्थापनेकडे कूच सुरु केली आहे. अद्याप कोणत्याही जागेचा निकाल हाती आलेला नसून तृणमूलला जवळपास २०५ जागांवर बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्ष जिंकत असताना ममता बॅनर्जी यांची जागा धोक्यात आली होती. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना मतमोजणीच्या सातव्य़ा फेऱ्यांपर्यंत झुंझवत ठेवले होते. मात्र, अखेर ममता यांना आघाडी मिळाली आहे.  पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी  ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या १५०० मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000 वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला.

Web Title: West Bengal Assembly Election Results Live: Special thanks to Mamata Banerjee from MNS Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.