West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:39+5:302021-04-09T04:27:07+5:30
निवडणूक आयोगाने कारवाई करावी
- एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कथित रूपात मतदारांना एक -एक हज़ार रुपयांचे कूपन वाटले गेल्याचा मुद्दा तापला आहे. काँग्रेस, माकप आणि तृणमूल काँग्रेसने या मुद्यावर निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी पुरावा म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात भाजप नेता मत मिळण्यासाठी रुपये देताना दिसतो. मोइत्रा यांनी आयोगाला टॅग करून ट्वीट केले. “भाजपच्या तक्रारी; परंतु टीएमसीच्या तक्रारींचे काय?, व्हिडिओ पुरावा. त्यात भाजप उमेदवार मतांसाठी रुपये देत आहे.
भाजपच्या बैठका आणि मत देण्यासाठी रोख पैसे दिले जात असताना त्यावर कोणती कारवाई झाली? आयोगाने कमीतकमी चेहरा तरी भेदभावाचा ठेवू नये.” महुआ मोइत्रा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, “भाजप निवडणूक आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन करीत आहे आणि निवडणूक आयोग मूकदर्शक बनला आहे.”
सूत्रांनुसार भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक-एक हजार रुपयांचे कूपन देऊन मतदारांना खात्री दिली की, मत देऊन आल्यावर कूपन देऊन एक हजार रुपये घेऊन जावे. कथित रूपात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडे या कामाची जबाबदारी दिली गेली आहे. सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनीही भाजपवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.