पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरणही तापलं आहे. याच दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. त्यानंतर आता शनिवारी सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी भाजपवर निशाणा साधला. "पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. तेव्हा देशव्यापी आश्वासानाचा संदेश जाईल. मी कोणत्याही अटींशिवाय ममता बॅनर्जींना समर्थन दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल," असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला. यशवंत सिन्हा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "मी त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या आपली लढाई लढत आहेत. त्या बंगालची लढाई लढत आहेत, त्या राष्ट्रासाठीही लढत आहेत. बंगालच्या निवडणुकांचा ज्या प्रकारे भाजपनं प्रचार केला त्यावरून हा राष्ट्रीय महत्त्व असलेली निवडणूक झाली आहे," असं ते म्हणाले. "यासाठी ममता बॅनर्जी यांचा विजय होणं महत्त्वाचं आहे आणि बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला पाहिजे. यातून एक देशव्यापी संदेश जाईल," असंही सिन्हा म्हणाले. यावेळी ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीवरही त्यांनी वक्तव्य केलं. भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे खोटं पसरवण्यात आलं. असं असलं तरी नंदीग्राम येथे त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायावर प्लॅस्टर लावण्यात आलं होतं. त्यांना अन्य ठिकाणीही दुखापत झाली आहे. यानंतरही त्या निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे ते म्हणाले.
West Bengal Election 2021: बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यास देशव्यापी संदेश जाईल - यशवंत सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 9:08 PM
West Bengal Election 2021: शनिवारीच यशवंत सिन्हा यांनी केला होता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
ठळक मुद्देशनिवारीच यशवंत सिन्हा यांनी केला होता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशदीर्घकाळापासून ते सक्रीय राजकारणापासून होते दूर