कोलकाता - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आज पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या (West Bengal) रणांगणात उतरले. "यावेळी बंगालमधील निवडणूक ऐतिहासिक होईल. ममता बॅनर्जींना गुंडं लोक निवडणूक जिंकूण देतात. त्यांच्या 'दंगा प्रमुखां'सोबत भाजपचे 'ब्लॉक प्रमुख' लढतील आणि जिंकतीलही," अशा शब्दात शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते कूचबिहारमध्ये (cooch behar) रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. (West Bengal cooch behar home minister Amit Shah in Poriborton yatra)
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल.
समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
यावेळी, भाजपचे सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल, असेही शाह म्हणाले.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, येथील विकासासाठी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने काही केले नाही. भाजप सरकार, मोदींचे सूत्र 'सबका साथ-सबका विकास', या मार्गाने चालत आहे. आम्ही सर्व समाजांची संस्कृती, भाषा, संगीत आणि साहित्य पुढे घेऊन जाणारे लोक आहोत. यामुळेच हळू-हळू संपूर्ण देश मोदींच्या नेतृत्वात भाजपशी जोडला जात आहे. यावेळी, ममता दीदी, ही लढाई आपण जिंकू शकणार नाही. कारण बंगालच्या जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे, असेही शाह म्हणाले.
व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं