"जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:52 PM2021-05-02T16:52:33+5:302021-05-02T17:00:38+5:30

पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर बोलत असताना राज्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे. 

west bengal election 2021 bjp leader chandrakant patil warns ncp minister chhagan bhujbal | "जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

"जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

Next

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. यातील पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपचं आव्हान फोडून काढत पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश प्राप्त केल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. याच निकालावर बोलत असताना राज्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रोखठोक इशारा दिला आहे. 

छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यात भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. "बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाली आहे", असा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना थेट इशाराच दिला आहे. 

"छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले. 
"पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे असं कसं होऊ शकतं.

बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करत असतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो आणि पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं. वर्षानुवर्षे तिथं सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहेत", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले

काय म्हणाले होते भुजबळ?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'मेरा बंगाल नहीं दूंगी म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या. आता देशात भाजपविरोधी लाट तयार झालीय', असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या आणि मैं अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाळ्या होत्या. त्याचप्रमाणे ममता दीदी देखील मैं अपना बंगाल नहीं दुंगी म्हणत लढल्या. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही", असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लागवला होता. 

Web Title: west bengal election 2021 bjp leader chandrakant patil warns ncp minister chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.