Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:46 AM2021-03-10T08:46:35+5:302021-03-10T08:47:17+5:30

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यंदा 50 महिलांना उमेदवारी दिली आहे.

west bengal election 2021 bjp mp locket chatterjee shares video of tmc mp touches cheeks of female mla | Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले

Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. (west bengal election 2021 bjp mp locket chatterjee shares video of tmc mp touches cheeks of female mla)

बंगालमधील भाजपाचे (BJP) खासदार लॉकेट चॅटर्जी (Locket Chatterjee) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत तृणमूल काँग्रेस (TMC) आणि खासदार कल्याण बॅनर्जी  (Kalyan Banerjee)  यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये टीएमसीचे खासदार पत्रकार परिषदेत पार्टीच्या एका महिला आमदाराचे गाल सर्वांसमोर ओढताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, यामध्ये दिसणारी व्यक्ती टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचा दावा लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, "टीएमसी महिलांचे सबलीकरण करीत आहे, हे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि बंकुराच्या महिला आमदार आहेत, ज्या तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत. लाज वाटली पाहिजे."

हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात भाजपाने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्कार, विनयभंग यासारख्या महिलांच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली नाही. राज्यातील महिलांवरील गुन्हेगारीची आकडेवारीसुद्धा राज्यातील ममता सरकारने एनसीआरबीला दिली नाही. त्यामुळे सविस्तर अहवालही तयार केलेला नाही.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यंदा 50 महिलांना उमेदवारी दिली आहे. अलीकडेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महिला सुरक्षा आणि महागाई संदर्भात कोलकाता येथे एक रॅली काढली होती. या रॅलीत त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला दिसून आल्या होत्या.

पाच आमदारांचा टीएमसीला धक्का!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे. ओपिनियन पोलमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Read in English

Web Title: west bengal election 2021 bjp mp locket chatterjee shares video of tmc mp touches cheeks of female mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.