शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Video: TMC खासदाराने चारचौघांत महिला आमदाराचे गाल ओढले; भाजपाला आयतेच कोलित सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 8:46 AM

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यंदा 50 महिलांना उमेदवारी दिली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच काही नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. (west bengal election 2021 bjp mp locket chatterjee shares video of tmc mp touches cheeks of female mla)

बंगालमधील भाजपाचे (BJP) खासदार लॉकेट चॅटर्जी (Locket Chatterjee) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत तृणमूल काँग्रेस (TMC) आणि खासदार कल्याण बॅनर्जी  (Kalyan Banerjee)  यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये टीएमसीचे खासदार पत्रकार परिषदेत पार्टीच्या एका महिला आमदाराचे गाल सर्वांसमोर ओढताना दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, यामध्ये दिसणारी व्यक्ती टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचा दावा लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, "टीएमसी महिलांचे सबलीकरण करीत आहे, हे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि बंकुराच्या महिला आमदार आहेत, ज्या तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत. लाज वाटली पाहिजे."

हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात भाजपाने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांत बलात्कार, विनयभंग यासारख्या महिलांच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली नाही. राज्यातील महिलांवरील गुन्हेगारीची आकडेवारीसुद्धा राज्यातील ममता सरकारने एनसीआरबीला दिली नाही. त्यामुळे सविस्तर अहवालही तयार केलेला नाही.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने यंदा 50 महिलांना उमेदवारी दिली आहे. अलीकडेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही महिला सुरक्षा आणि महागाई संदर्भात कोलकाता येथे एक रॅली काढली होती. या रॅलीत त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला दिसून आल्या होत्या.

पाच आमदारांचा टीएमसीला धक्का!पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे. ओपिनियन पोलमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१tmcठाणे महापालिकाBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल