पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. सोमवापी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर पलटवार केला. "ममता बॅनर्जी यांना ईद मुबारक म्हणण्याची सवय आहे. म्हणून त्यांनी होळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी होली मुबारक असं म्हटलं. बेगमना मतदान करू नका. जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर पश्चिम बंगाल मिनी पाकिस्तान बनेल. बेगम अचानक बदलल्या आहेत आणि त्या आता मंदिरात जाऊ लागल्या आहेत, कारण त्यांना पराभवाची भीती आहे," असं म्हणत अधिकारी यांनी निशाणा साधला."जे लोकं आज या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आले आहेत ते बाहेरून आले आहेत आणि या ठिकाणी तात्पुरते राहिले आहेत. निवडणुकीनंतर ते उडून जातील. परंतु आपण या ठिकाणचे स्थायी निवासी आहोत आणि लोकांच्या सुख दु:खासाठी काय उपलब्ध असू," असं अधिकारी म्हणाले. ममता बॅनर्जी यांची एक कथित ऑडिओ क्लिप लीक झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. "ऑडिओमध्ये ऐकू शकतो. त्या नंदीग्राममध्ये पहिलेही येत नव्हत्या आणि नंतरही येणार नाहीत. अशात त्या सातत्यानं खोटं बोलत आहेत की नंदीग्रामच्या लोकांसाठी त्या कायम उपलब्ध असतील. परंतु त्या नंदीग्राममध्ये कधी येणार नाहीत हे सत्य आहे," असंही ते म्हणाले. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.
West Bengal Election : सुवेंदु अधिकारी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले,"बेगम ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला बनवतील मिनी पाकिस्तान"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 9:11 AM
West Bengal Election 2021 : सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.
ठळक मुद्देसुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत.यापूर्वी ममता बॅनर्जीनी भाजपला रसगुल्ला मिळणार असल्याचा लगावला होता टोला.