प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी; म्हणाल्या,"जाणूनबुजून हल्ला, हे षडयंत्र"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:30 PM2021-03-10T20:30:00+5:302021-03-10T20:31:03+5:30

West Bengal Election : सहानुभूती मिळवण्यासाठी ममता बँनर्जींचं नाटक, भाजपचा आरोप

west bengal election 2021cm mamata banerjee injured in nandigram | प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी; म्हणाल्या,"जाणूनबुजून हल्ला, हे षडयंत्र"

प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी; म्हणाल्या,"जाणूनबुजून हल्ला, हे षडयंत्र"

Next
ठळक मुद्देप्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापतसहानुभूती मिळवण्यासाठी ममता बँनर्जींचं नाटंक, भाजपचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथील प्रचारादरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान हे भाजपचं षडयंत्र असल्याचं म्हणत त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं. त्यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतलं आणि लोकांच्याही भेटी घेतल्या. यादरम्यान एका ठिकाणी गर्दी जमा झाल्यानं त्यांच्या पायाला दुखापत झाली. तर दुसरीकडे भाजपनं त्यांच्यावर हल्लाबोल करत सहानुभूती मिळवण्यासाठी त्या हे करत असल्याचा आरोप केला. 

"गाडीजवळ असताना चार पाच लोकांनी मला धक्का दिला. माझ्या पायाला दुखापत झाली असून पायाला सूजही आली आहे. आता मी कोलकात्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी जात आहे. पायाला खुप दुखापत झाली आहे. मला तापही आला आहे. त्या ठिकाणी कोणतेही पोलीस उपस्थित नव्हते. चार पाच लोकांनी हे जाणूनबुजून केलं आहे. हे एख षडयंत्र आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. दरम्यान, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसनंही प्रतिक्रिया देत त्यांच्या चार पाच लोकांनी हल्ला केल्याचं म्हटलं. तसंच हे एक षडयंत्र असून पक्ष निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार असल्याचंही सांगण्यात आलं. 



पोलीस कर्मचारी उपस्थित 

"त्या मुख्यमंत्री आहेत आणि ही या ठिकाणची परिस्थिती आहे. ३००-४०० पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणी हल्ला करेल हे स्वप्नातही पाहू शकत नाही. हल्ला तर दूरची गोष्ट आहे. त्यांच्याकडे कोणी डोळे वर करूनही पाहू शकत नाही. त्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा एक अपघात असू शकतो," असं मत भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केलं. 

Web Title: west bengal election 2021cm mamata banerjee injured in nandigram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.