West Bengal Election: भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 06:37 AM2021-03-21T06:37:06+5:302021-03-21T06:37:44+5:30

लोकांच्या हत्येसाठी ज्या पक्षाने दंगे केले त्यांना कधीच प. बंगालमध्ये राज्य करू देऊ नका. भाजपमध्ये तर महिलादेखील सुरक्षित नाहीत.

West Bengal Election: BJP the world's largest ransom party; Mamata Banerjee's harsh criticism | West Bengal Election: भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका 

West Bengal Election: भाजप जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष; ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका 

Next

कोलकाता : भाजप हा जगातील सर्वात मोठा खंडणीखोर पक्ष आहे, अशा शब्दांत घणाघाती टीका करताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाहन केले की, त्यांना कधीही सत्तेत येऊ देऊ नका. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात हल्दिया येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी भाजपवर दंगे करण्याचा कट करणे, लोकांची हत्या करणे आणि दलित मुलींचा छळ केल्याचाही आरोप केला. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लोकांच्या हत्येसाठी ज्या पक्षाने दंगे केले त्यांना कधीच प. बंगालमध्ये राज्य करू देऊ नका. भाजपमध्ये तर महिलादेखील सुरक्षित नाहीत. भाजप लोकशाही पद्धतीने निवडणुका लढू शकत नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक क्षेत्र विकायला काढले आहे. अर्थव्यवस्था बरबाद केली आहे. रेल्वे, कोळसा, बीएसएनएल, विमा क्षेत्र आणि बँकांचे खासगीकरण केले जात आहे. एखाद्या दिवशी हल्दिया बंदरही विक्री होऊ शकते. त्या म्हणाल्या की, मतदानापूर्वी ईव्हीएमची ३० वेळा तपासणी व्हायला हवी. जर मशीनमध्ये गडबड असेल तर, ठीक होईपर्यंत शांतता राखा. हल्दियामध्ये मच्छीमारांसाठी केंद्र, ताजपूरमध्ये १५ हजार कोटी रुपये खर्चून बंदर उभारण्यात येईल. यातून ३५ हजार नव्या नोकऱ्या निर्माण होतील, हल्दिया व नंदिग्राममध्ये पूल बनविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. 

भाजप खंडणीखोर आहे. पीएम केअर फंडच्या अंतर्गत किती पैसा गोळा केला. जर प. बंगालच्या लोकांना शांततेत आणि दंगामुक्त राज्य हवे असेल तर, तृणमूल काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे.   - ममता बॅनर्जी  

Web Title: West Bengal Election: BJP the world's largest ransom party; Mamata Banerjee's harsh criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.