मुस्लीम मतदारांनी एकत्र येण्याचं आवाहन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली होती. दरम्यान यावर ममता बॅनर्जी आक्रमक झाल्याचं पाहायवा मिळालं. "धर्माच्या आधारावार मतांचं विभाजन करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाच्या विरोधात आपण आवाज उठवत राहू. निवडणूक आयोगानं १० नोटीसा जरी पाठवल्या तरी आपला दृष्टीकोन बदलणार नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. "निवडणूक आयोग हवं तर मला १० नोटीसा पाठवू शकतो. परंतु त्याचं उत्तर एकच असणार आहे. मी कायम हिंदूमुस्लीम मतांच्या विभाजनाच्या विरोधात बोलत राहणार. मी धर्माच्या आधारावर मतदारांचं विभाजन करण्याच्या विरोधात उभी राहिन," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदू व मुस्लिमांच्या व्होटबँकेचा उल्लेख करतात त्या वेळी त्यांच्याविरोधात कुठलीच तक्रार का दाखल होत नाही?, असा सवाल ममता यांनी केला. नंदिग्राममध्ये निवडणूक असताना काही नेत्यांनी ‘मिनी पाकिस्तान’ या शब्दाचा उपयोग केला होता. त्यांच्याविरोधात किती तक्रारी दाखल झाल्या?, असा सवाल त्यांनी आयोगाला केला.निवडणूक आयोगानं मागितलं होतं स्पष्टीकरणनिवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना ३ एप्रिल रोजी दिलेल्या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. आपल्या मतांचं निरनिराळ्या पक्षांमध्ये विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांना केलं होतं. तक्रारीनुसार त्यांनी धर्माच्या आधारे तृणमूल काँग्रेससाठी मत मागितलं होतं.
West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 8:33 AM
West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरण
ठळक मुद्देनिवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरणहिंदू मुस्लीम मतांच्या विभाजनाविरोधात कायम बोलणार, ममता बॅनर्जी आक्रमक