हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:00 PM2021-03-31T17:00:19+5:302021-03-31T17:01:23+5:30

भाजपला टक्कर देण्याची तयारी; ठाकरे, पवार, गांधींना पाठवलेल्या पत्रामुळे देशात महाआघाडी?

west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes to sonia gandhi sharad pawar uddhav thackeray | हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार?

हीच ती वेळ! उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींना पत्र; देशात महाआघाडी होणार?

Next

कोलकाता/नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला असल्यानं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी सलग तिसरी निवडणूक जिंकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. (west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes to sonia gandhi sharad pawar uddhav thackeray)

"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'

बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना ममता बॅनर्जींनी देशातल्या भाजपेतर पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन भाजपचा मुकाबला करायला हवा, असं आवाहन बॅनर्जींनी केलं आहे.

फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक, जगन रेड्डी, के. एस. रेड्डी, फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांनी पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

नॅशनल कॅपिटल टेरिटरी कायद्यातील सुधारणेला विरोध
मोदी सरकारनं संसदेत नॅशनल कॅपिटल टेरिटरी कायद्यात सुधापणा करणारं विधेयक मंजूर केलं. या विधेयकाला बॅनर्जींनी विरोध दर्शवला. मोदी सरकारनं पारित करून घेतलेलं विधेयक संघराज्य पद्धतीला धक्का लावणारं असल्याचं बॅनर्जींनी पत्रात म्हटलं आहे. विरोधी पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांमध्ये अशाच प्रकारे राजकारण सुरू आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारच्या कारभारात अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Read in English

Web Title: west bengal election lets fight bjp unitedly cm mamata banerjee writes to sonia gandhi sharad pawar uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.