West Bengal Assembly Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना चहा बनवून देतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 09:58 PM2021-03-09T21:58:34+5:302021-03-09T22:02:40+5:30

Mamata Banerjee turns chaiwali in Nandigram, day before nomination: यावेळी लोकांना चहा देताना स्थानिक रहिवाशांसोबत ममता बॅनर्जी यांनी संवाद साधला. यावेळी चहा टपरीजवळ अनेकांनी गर्दी केली होती

West Bengal Election: Mamata Banerjee visited a tea stall in Nandigram and served tea to the people | West Bengal Assembly Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना चहा बनवून देतात तेव्हा...

West Bengal Assembly Election: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना चहा बनवून देतात तेव्हा...

Next
ठळक मुद्देममता बॅनर्जी यांनी लोकांना चहा देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही ऑगस्ट २०१९ अशी घटना घडली आहे. कधीकधी छोट्या गोष्टीही आयुष्यात खूप आनंद देऊ शकतातममता बॅनर्जी या नंदिग्राम मतदारसंघात २ दिवसांच्या दौऱ्यावर आहे

नंदीग्राम – पश्चिम बंगाल निवडणुकीच्या रणसंग्रामाला वेग आला आहे, त्यातच यंदा भाजपा(BJP) आणि ममता बॅनर्जी (Mamata Manerjee) यांच्यात थेट लढत आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींनी राज्यात वेगवान प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यातच निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम(Nandigram Assembly Seat) विधानसभा मतदारसंघात फूटपाथवरील चहा टपरीवर लोकांना चहा देताना दिसून आल्या.

यावेळी लोकांना चहा देताना स्थानिक रहिवाशांसोबत ममता बॅनर्जी यांनी संवाद साधला. यावेळी चहा टपरीजवळ अनेकांनी गर्दी केली होती, ममता बॅनर्जी यांनी लोकांना चहा देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही ऑगस्ट २०१९ मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चहा बनवून लोकांना दिला होता. त्यावेळीही ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं होतं की, कधीकधी छोट्या गोष्टीही आयुष्यात खूप आनंद देऊ शकतात असं सांगितलं होते.

ममता बॅनर्जी या नंदिग्राम मतदारसंघात २ दिवसांच्या दौऱ्यावर आहे, बुधवारी ममता बॅनर्जी या नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघातून भाजपाने टीएमसीचे माजी नेते ज्यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला आहे ते सुवेंद्रु अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे याठिकाणी ममता बॅनर्जी आणि सुवेंद्रु अधिकारी यांच्यात थेट लढत होणार आहे.

म्हणून मी नंदिग्राममधून लढणार

'मी भवानीपूरमधूनही निवडणूक लढवू शकले असते. मात्र, नंदीग्राममधील आमदाराने राजीनामा दिला, तेव्हा मी एका रॅलीतून आपल्याकडून जाणण्याचा प्रयत्न केला होता, की मी नंदीग्राममधून निवडणूक लढू शकते? आपण हो म्हणाला होतात. म्हणनच मी येथून लढण्याचा निर्णय घेतला.'' ममता म्हणाल्या, सिंगूर आणि नंदीग्राम ही आंदोलनाची भूमी आहे. यामुळेच या दोन्हीपैकी एका जागेवरून लढण्याचा माझा विचार होता असं त्यांनी सांगितले.

भाजपाला एप्रिल फुल बनवा

माणसांत 70-30 (हिंदू-मुस्लीम) असे काही नसते. फुटीरतेचे राजकारण नंदीग्राममध्ये कामी येणार नाही. नंदीग्रामचे नाव संपूर्ण जगाला माहीत आहे. नंदीग्रामहेच सद्भावनेचे दुसरे नाव आहे. मी सर्वांचे नाव विसरू शकते. मात्र, नंदीग्रामचे नाही. सिंगूर, नंदीग्राम नसते, तर आंदोलनाचे वादळ आले नसते. मीही हिंदू घरातलीच मुलगी आहे. माझ्यासोबत हिंदू कार्ड खेळू नका.'' बंगालची मुलगी बाहेरची कशी झाली? मी येथे दर तीन महिन्याला येणार. 1 एप्रिलला येथे मतदान होईल. त्यांचे (BJP) एप्रिल फूल करून टाका. एक एप्रिलला खेळ होईल. मला मंदिर , मशीद , गुरुद्वारा... सर्वांचे समर्थन हवे आहे असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

Web Title: West Bengal Election: Mamata Banerjee visited a tea stall in Nandigram and served tea to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.