West Bengal Election : अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, "हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:27 PM2021-03-15T15:27:56+5:302021-03-15T15:30:44+5:30
West Bengal Election : ममता बॅनर्जींवर अमित शाहंनी साधला निशाणा
पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला. आज आपलं हेलिकॉप्टर खराब झालं. परंतु आपण याला षडयंत्र म्हणणार नाही असं म्हणत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.
"आज मला येण्यास थोडा उशिर झाला. माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. परंतु हे कोणाचं षडयंत्र होतं असं मी बिलकुल म्हणणार नाही," असं अमित शाह यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना झालेली दुखापत हा एक अपघात आहे. परंतु ममता बॅनर्जींच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मागे एक षडयंत्र आहे, असं म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केली.
"ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. परंतु ती कशी झाली याची माहितीच नाही. तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे की यामागे काही षडयंत्र आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार हा केवळ एक अपघात होता. दीदी (ममता बॅनर्जी) तुम्ही पूर्ण पश्चिम बंगाल व्हिलचेअरवर फिरत आहात. आपल्या पायाबाबत चिंता आहे. परंतु तुम्हाला आमच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांबद्दल मात्र कोणतीही चिंता नाही, ज्यांच्या मुलांची हत्या करण्यात आली," असं अमित शाह म्हणाले.
Mamata Ji has a leg injury, it's not known how she got it. TMC calls it a conspiracy, but EC says it was an accident. Didi, you're roaming around in a wheelchair, concerned about your leg, but not the pain of mothers of my 130 workers who were killed: HM in Ranibandh, West Bengal pic.twitter.com/uV6naRVRgz
— ANI (@ANI) March 15, 2021
हल्ला नाही
पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे राजकारण तापले असून, मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी जनतेसह विरोधकांना ‘सरप्राईज’ दिलं. प्रचार करताना जखमी झालेल्या ममतांनी ‘व्हीलचेअर’वर बसून चक्क ‘रोड शो’ केला. पाच किलोमीटरच्या या ‘रोड शो’मध्ये सहभागी होण्याअगोदर ‘मी अजूनही वेदना सहन करते आहे’, असे ट्वीट करत समर्थकांना भावनिक सादच घातली. दरम्यान, नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर कुठलाही हल्ला झाला नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.