सध्या देशात कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच उच्चस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला. दरम्यान, आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याबाबत त्यांनी लोकांसमोर खंत व्यक्त केली. "सकाळपासूनच मी अनेक बैठकांमध्ये व्यग्र होतो. कोरोनाच्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकलो नाही याचं मला दु:ख आहे. परंतु या ठिकाणी फार कमी लोकं आहेत. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "भाजपचं डबल इंजिन सरकार बंगालच्या विकासात कोणतीही कसर राहू देणार नाही. बंगालच्या लोकांना उत्तम शासन हवं आहे. सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी आणि हिंसाचारावर लगाम घातला जाईल. बंगालच्या लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं जाईल," असं मोदी यावेळी म्हणाले. "बंगालची जनता चांगल्या प्रशासनासाठी मतदान करत आहे. बंगालमधील जनता शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी आग्रही आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथील आपल्या रॅली रद्द केल्या होत्या.
West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 7:06 PM
West Bengal Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवाद
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवादकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकांमुळे रॅली केल्या होत्या रद्द