West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:28 PM2021-05-02T13:28:34+5:302021-05-02T13:29:04+5:30
West Bengal Election Result 2021: all exit poll goes wrong Mamata Banerjee TMC Leading in 200 plus seats बंगालमध्ये तृणमूलमध्ये २०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी; भाजपला शंभराच्या आत राहणार
देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर तासाभरापूर्वी १०० च्या पुढे गेलेला भाजप आता ८० च्या जवळ येताना दिसत आहे. West Bengal Election Result 2021 all exit poll goes wrong Mamata Banerjee TMC Leading in 200 plus seats
भाजप-तृणमूलमध्ये टशन, पण एका माणसाला वेगळंच टेन्शन; 'नोकरी' जाणार की राहणार?
भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.
बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी?
काय होते एक्झिट पोल्स?
पोल तृणमूल काँग्रेस भाजप
ऍक्सिस १३०-१५६ १३४-१६०
एबीपी-सी व्होटर १५२-१६४ १०९-१२१
चाणक्य १८० (+/-११) १०८ (+/-११)
रिपब्लिक-सीएनएक्स १२८-१३८ १३८-१४८