West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:34 PM2021-05-04T18:34:21+5:302021-05-04T18:35:53+5:30

West Bengal Election Result 2021: दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

West Bengal Election Result 2021: "BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP after victory in West Bengal | West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

Next
ठळक मुद्देभाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहेदारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकून विजय मिळवणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचाममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दारुण पराभव केला आहे. दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांनी ते दाखवून दिले आहे. लोकशाहीमध्ये अखेरीच लोकांचे मत महत्त्वाचे असते, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. तसेच भाजपाला आता पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे, असा टोला लगावला. ("BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP  after victory in West Bengal)

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमधून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, भाजपाला पराभूत करता येऊ शकते. लोकांना ते आवडते. लोकांनीच त्यासाठी रस्ता दाखवला आहे. लोकशाहीमध्ये अहंकार दाखवता कामा नये. भाजपा एक जातियवादी पक्ष आहे. ते संकटं निर्माण करतात. फेक व्हिडीओंचा उपयोग करतात. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात. भाजपा या देशाच्या घटनात्मक चौकटीला उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.  

भाजपा सरकार युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशनसाठी परवानगी देत नाही आहे. ते ऑक्सिजन देत नाही आहेत. त्यांना पॉलिटिकल ऑक्सिजनची गरज आहे. भाजपासोबत लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जींनी केले. 

यावेळी ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनाही टोला लगावला, सीबीआय, ईडी यासारख्या यंत्रणांचा उपयोग करणारे राजकारण होता कामा नये. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या राजकारणाचा अंत असेल. भाजपाचे जुन्या नेत्यांनीही मोदी-शाहा स्टाइल राजकारणावर टीका केलेली आहे. देश आता अशा प्रकारच्या राजकारणाचा सामना करू शकणार नाही. मोदी-शाहांच्या तुलनेक अनेक चांगले उमेदवार देशात आहेत, असेही त्या म्हणाल्या.

निकालांनंतर बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचे खापरही त्यांनी भाजपाच्या माथ्यावर फोडले. हा भाजपाचा प्रोपेगेंडा आहे. काही किरकोळ घटना घडल्या आहेत. त्या प्रत्येक राज्यात घडतात. त्या योग्य आहेत असे मी म्हणणार नाही. पण दारुण पराभवानंतर राज्यात जातीय दंगली भडकवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाविरोधात लढण्यासाठी लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

Web Title: West Bengal Election Result 2021: "BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP after victory in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.