West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'मेरा बंगाल नहीं दूंगी म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या. आता देशात भाजपविरोधी लाट तयार झालीय', असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (west bengal election result 2021 chhagan bhujbal congratulate mamata banerjee and attacks on bjp)
पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून दीदींचं अभिनंदन अन् दिले महत्वपूर्ण संकेतछगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या घवघवीत यशाचं कौतुक केलं. "ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या आणि मैं अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाळ्या होत्या. त्याचप्रमाणे ममता दीदी देखील मैं अपना बंगाल नहीं दुंगी म्हणत लढल्या. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही", असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लागवला आहे.
भाजपकडून याआधी मोदी लाट, मोदी लाट असा उल्लेख केला जात होता. पण आता संपूर्ण देशभरात भाजप विरोधात प्रचंड लाट तयार झाली आहे. आसाम वगळता भाजपचा कुठेच यश मिळालेले दिसत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
शरद पवारांनीही केलं मतात दीदींचं अभिनंदनराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या यशाबद्दल ममता बॅनर्जी यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं आहे. "तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात", असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.