West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:56 AM2021-05-02T08:56:00+5:302021-05-02T09:32:21+5:30

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये आल्या आहेत.

West Bengal Election Result 2021 Highlight: BJP's strong push ; Mamata Banerjee trailing in Nandigram | West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

googlenewsNext

देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election Result Highlight) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये (Mamata Banerjee ) आल्या आहेत. भाजपाने कडवी टक्कर दिली असून सुरुवातीच्या कलांमध्ये एक आणि दोन आकड्यांच्या फरकाने तृणमूल पुढे असल्याचे दिसत आहे. (West Bengal Election Result 2021 Highlight : - Mamata Banerjee trailing in Nandigram in postal vote counting.)


पश्चिम बंगालमध्ये 96 जागांवर सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेस 49 आणि भाजपा 47 जागांवर पुढे दिसत आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके 10, तर एडीएएमके 1 जागेवर पुढे आहे. तर आसाममध्ये भाजपा 5, काँग्रेस 3 जागांवर पुढे दिसत आहे.  केरळमध्ये एलडीएफ 31 काँग्रेस 27 भाजपा 3 जागांवर पुढे दिसत आहे. 


धक्कादायक म्हणजे सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी करण्यात आली. यामध्ये भाजपाने जोरदार टक्कर दिली आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आघाडीवर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. 

या वेळी बंगालमध्ये टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात 44 दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे 70 रॅली काढल्या. टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे 150 जाहीर सभांना संबोधित केले.
ममता बॅनर्जी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केंद्राला जबाबदार धरताना दिसल्या. म्हणून त्यांनी असेही आश्वासन दिले की टीएमसी सरकार आल्यास बंगालच्या लोकांना विनामूल्य लसीकरण केले जाईल. राहुल-ममता नंतर पंतप्रधान मोदींनीही सर्व सभा रद्द केल्या आणि भाजपने सभेसाठी फक्त 500 लोकांची संख्या मर्यादित केली

Web Title: West Bengal Election Result 2021 Highlight: BJP's strong push ; Mamata Banerjee trailing in Nandigram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.