West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 11:01 AM2021-05-02T11:01:47+5:302021-05-02T11:03:43+5:30
West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: दिग्गज नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता; खासदार असलेले भाजप नेते पिछाडीवर
कोलकाता: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास १९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १०० जागांच्या आसपास पोहोचताना दिसत आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. तृणमूलच्या अनेक आमदारांनी राजीनामा देऊन कमळ हाती घेतलं. तृणमूलच्या हातून बंगाल हिसकावून घेण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली. भाजपनं काही खासदारांनादेखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र यातील बरेचसे खासदार सध्या पिछाडीवर आहेत.
अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल
दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीनंतर चुंचुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या लॉकेट चॅटर्जी ३३०० मतांनी पिछाडीवर आहेत. चॅटर्जी लोकसभेत हुगळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. भाजपचे आणखी एक खासदार बाबुल सुप्रियोदेखील सध्या पिछाडीवर आहेत. आसनसोलचे खासदार असलेल्या सुप्रियो यांना भाजपनं टॉलीगंजमधून उमेदवारी दिली. मात्र सध्या ते १३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. भाजपचे स्वपन दासगुप्ता तारकेश्वर मतदारसंघात ३ हजार मतांनी मागे आहेत. माजी पत्रकार दासगुप्ता भाजपचे राज्यसभेचे खासदार होते. मात्र भाजपनं त्यांना विधानभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगितलं.