West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 02:18 PM2021-05-02T14:18:43+5:302021-05-02T14:20:58+5:30

West Bengal Election Result 2021: मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

West Bengal Election Result 2021 Maharashtra Minister and Shiv Sena leader Gulabrao Patil comment on West Bengal election result | West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

Next

West Bengal Election Result 2021: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प.बंगालच्या निकालावर महत्वपूर्ण विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Maharashtra Minister and Shiv Sena leader Gulabrao Patil comment on West Bengal election result )

बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का

"मोदींचा करिष्मा आता ओसरला आहे याची जाणीव पश्चिम बंगालच्या निकालानं संपूर्ण देशाला आता झाली आहे. करिष्म्यापेक्षा राज्याचा विकास कोण करु शकतो, मातीशी कोण जुळला आहे याचा विचार मदतारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला जोरदार चपराक लगावली आहे", अशी रोखठोक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले

पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं होतं. यात सध्याच्या आकडेवारीनुसार २०७ जागांवर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसचा पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपला फक्त ८१ जागांवर आघाडी मिळाली आहे. प.बंगालमध्ये बहुमताचा आकडा १४७ इतका आहे. 

काम कोण करू शकतो हे पाहून लोकांनी मतदान केलं
"पश्चिम बंगालच्या जनतेनं राज्याचं नेतृत्व कोण करू शकतो. जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो. याचा विचार करुन ममता बॅनर्जी यांच्यावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भाजपला थेट केंद्रातून रसद पुरवली गेली. पण जनता त्याला बळी पडली नाही. भाजपकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला", असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. 
 

Web Title: West Bengal Election Result 2021 Maharashtra Minister and Shiv Sena leader Gulabrao Patil comment on West Bengal election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.