शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 14:44 IST

West Bengal Election Result 2021: २०० जागा जिंकून म्हणणाऱ्या भाजपला बंगालमध्ये १०० जागाही मिळाल्या नाहीत; प्रशांत किशोर यांचा अंदाज खरा ठरला

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूक विजयाची हॅटट्रिक केली. भारतीय जनता पक्षानं गेल्या काही महिन्यांपासून बंगालमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झंझावाती प्रचार सभा घेऊन, भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंगालमध्ये तळ ठोकूनही भाजपला शंभरी गाठता आली नाही. दोनशे जागा जिंकू अशी दर्पोक्ती भाजप नेत्यांनी केली होती. तर भाजपला १०० जागादेखील मिळणार नाहीत, असा अंदाज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वर्तवला होता. त्यांचा अंदाज अगदी अचूक ठरला.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला धक्का दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी अस्वस्थ होत्या. त्यांनी मला फोन करून तातडीनं येण्यास सांगितलं, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूलनं आपली रणनीती बदलली. ही रणनीती भाजपच्या फारशी लक्षात आली नाही. थेट लोकांशी जोडले जाणारे कार्यक्रम तृणमूलनं हाती घेतली. जमिनीवर अधिकाधिक काम सुरू केलं, असं किशोर यांनी 'द टेलिग्राफ'ला सांगितलं.आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणाबंगालमध्ये अमित शहांनी जातीय लक्ष घातलं होतं. मात्र तरीही भाजपला शंभरी गाठता आली नाही. या पार्श्वभूमीवर किशोर यांनी शहांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. 'कदाचित माझ्या बोलण्यात तुम्हाला अहंकार वाटू शकेल. पण मला अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर वाटतात. त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणतं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं?', असा थेट सवाल किशोर यांनी उपस्थित केला.गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा करिश्मा आहे. त्यांच्या हाताशी खूप संसाधनं आहेत. संघ आणि पक्षाचं मोठं नेटवर्क त्यांच्याकडे आहे. त्यांच्यामागे सरकार आणि सरकारी यंत्रणादेखील भक्कमपणे उभ्या आहेत. निवडणूक आयोगचे निर्णयदेखील त्यांच्या पथ्यावर पडणारे होते आणि तरीही ते हरले. यावरून तुम्हाला अमित शहांच्या नावलौकिकाची, प्रतिष्ठेची कल्पना येईल, असा टोला त्यांनी लगावला.पश्चिम बंगालची निवडणूक आम्ही मोठ्या फरकानं जिंकू याबद्दल मला विश्वास होता, असं किशोर म्हणाले. अमित शहा आणि भाजपचं नेमकं काय चुकलं हेदेखील त्यांनी सांगितलं. 'प्रोपॅगेंडा तुम्हाला निवडणूक जिंकवून देऊ शकत नाही. भाजप नेत्यांमध्ये विशेषत: अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती. ते आकाशात उडत होते. त्यामुळे ते जमिनीपासून दूर गेले. आम्ही विजयी होणार आहोत, असं जाहीर करून ते लढायला आले. मात्र त्या केवळ पोकळ बाता होत्या,' अशा शब्दांत किशोर यांनी शहांसह भाजपवर टीका केली.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीPrashant Kishoreप्रशांत किशोरAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021